समर्थवाडी

सुख़समाधानासाठी, आनंदासाठी आपन प्रपंचाचा अंगिकार करतो. पण अशा व्यवहारातुन मिळणारे सुख क्षणभंगुर असते. कदाचित या क्षणभंगुर आनंदापासुन अनंतकॉटी समाधान साधण्यासाठी अध्यात्माची गरज या कलियुगात आहे. अशी प्रपंच व अध्यात्माची सांगड केवळ संत सत्पुरूषच घालु शकतात. ज्या प्रकारे संत अरण्यात, डोंगरात, कडेकपारीत राहुन, तप करून परमेश्वर प्राप्त करून घेतात, त्या प्रमाणे साधना उपासना, जप तप अथवा व्रत हे असे एकांत वनश्रींच्या, पशु पक्षांच्या सानिध्यात राहुन केल्यास परमेश्वर प्राप्त करून घेता येतो.
या तत्वाचा पूर्ण अभ्यास करून सप्तरंगी ईंद्रधनुष्याचा प्रकाश सगऴीकडे पसरावा, समाज सुढ़ूढ बनावा आणि सगुण साकार वृत्तीचा संस्कार पुर्ण करुन हि परंपरा अशीच पुढ़े चालावी यासाठी दत्तात्रेय महाराजांच्या साक्षीने, स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी हे उपासना स्थान, संप्रदायाला लाभलेल्या प्रेरक तत्त्वाच्या भक्तगणांच्या अथक परिश्रमांनी आज सिद्ध झाले आहे.
श्री समर्थ वाडी हे विष्णु पंचायतनाचे स्वरुप असुन येथे मारुती मंदिर, गायत्री मंदिर, शनि मंदिर, शिव मंदिर, सुर्य मंदिर, दत्त मंदिर, देवीचे स्थान, रुद्रभुमी, पादुका मंदिर, स्वामीगंगा, शैल्यमंदिर असे प्रतीके उभारण्यात आली आहे.२७ नक्षत्रे व १२ राशींचे वृक्ष लावण्यात आले आहेत. याखाली बसुन कोणत्याही पंथाची व्यक्ती, येथील नियम पाळुन त्या त्या शक्तीची आराधना, भक्ती करु शकते तसेच येथील ४ ध्यान गृहात बसुन ध्यानधारणा करु शकते.
श्री समर्थ वाडीत विविध प्रकारच्या पशु पक्ष्यांचे संगोपन करण्यात आले आहे.
येथे अवघ्या ६ एकराच्या नापीक परीसरात वातावरणातील प्रदुषण लक्षात घेवुन ७२००० औषधी वनस्पतींची लागवड
श्री समर्थ वाडीत सर्व प्रकारच्या पशु पक्षांचे संगोपन करण्यात आले आहे.
श्री समर्थ वाडी येथे अवघ्या ६ एकरच्या नापीक परीसरात वातावरणतील
प्रदुषनातील प्रदुषण लक्षात घेवुन ७२००० औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. वाडीत नित्यनियमितपणे अग्निहोत्र, याग, यज्ञ आणि होम संपन्न होतात. यामुळे वातावरणातील संतुलन राखण्यास मदत झाली आहे.
श्री स्वामी समर्थ या संस्थेने जवळच वाहणा-या ओढ़्यात धरण बांधुन शासनाच्या कार्यक्रमानुसार 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा प्रकल्प ६०००० घनलिटर क्षमतेचा राबविला आहे. त्यामुळे आसपासचे ७/८ किलोमीटचे क्षेत्र हिरवेगार दिसते. तसेच सौर उर्जा, सौर चुल व पवनचक्की यासारखे प्रकल्प कार्यान्वित केले आहे.
श्री स्वामी समर्थ या संस्थेने जवळच वाहणा-या ओढ़्यात धरण बांधुन शासनाच्या कार्यक्रमानुसार 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा प्रकल्प ६०००० घनलिटर क्षमतेचा राबविला आहे. त्यामुळे आसपासचे ७/८ किलोमीटचे क्षेत्र हिरवेगार दिसते. तसेच सौर उर्जा, सौर चुल व पवनचक्की यासारखे प्रकल्प कार्यान्वित केले आहे.
अशा या अदभुत, अध्यात्मिक व विज्ञानयुक्त स्थानाची निर्मीती पंचम गुरुपिठाधीश श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती उर्फ आठल्ये सर यांनी १५ एप्रिल १९९४ या शुभदिवशी दु. २ वा. केली.


दत्तजयंती उत्सव 2017

दत्तजयंती उत्सव 2017
More Photos

हनुमान जयंती मिरवणुक, २००९
More Videos

Sign In
User Id:
Password:
 
New member Sign Up here.

Advertise with us