सन १९७९ साली झालेल्या दृष्टांतानुसार स्वामी सखांनी विकटगड़ाच्या विकासाचे काम हाती घेतले होते. या दरम्यान येणारे अडचणी पैकी महत्वाची अडचण म्हणजे गडावर लागणारा वणवा, त्याची व्याप्ती व दाहकता दिवसेंदीवस जास्त जाणवायला लागली. दिवाळी नंतर सुकून जाणारे रान/गवत पेट घ्यायला मदत होते. या वणव्या मुळे सुमारे 6.2 टन प्रती हेक्टर जैविक काडी कचरा जळुन खाक होतो. त्याचा झालेला कर्ब वायू वातावरणात मिसळून पर्यावरणाला हानी करतो. अनेक प्रकारचे किडे, उंदीर, ससे, सा ळिन्दर, उद मांजर, पक्षांची पिल्ले, सरपटणारे प्राणी वगैरे मारुन जातात. परिसरातील जनतेची स्तावर मालमत्ता नष्ट होतात.वणव्यामुळे जमिनीचा सेंद्रीय कर्ब कमी होऊन जमिनीचा पृष्ठ भाग कठीण / कडक होतो व त्यामुळे त्यात पाणी झिरपण्याची प्रक्रिया थांबून पाणी आडवे वाहून पूर परिस्थिती निर्माण होते. डोंगर उतारा वरील सूक्ष्म मातीचा थर वाहून जाउन डोंगराळ भागा मध्ये वनस्पती जगण व वाढण ही नैसर्गिक प्रक्रिया बंद होऊन त्या भूभागाची अवनती होण्याची दूर गामी प्रक्रिया सुरू होते.

या सर्वांचा अभ्यास करून 'सगुणा वन संवर्धन तंत्रा च्या मदतीने 2017 सालापासून वणवा प्रतिबंध उपाय राबविण्यात येतात.