श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मीन राशी प्रमाणे त्यांचा आराध्य वृक्ष हा मोहाचे झाड आहे. स्वामी कार्य करीत असतांना आपल्या गुरूला शनीची साडेसाती लागु नये म्हणून मोहाच्या झाडाखाली शनिदेवतीची स्थापना करण्यात आली. या मंदिराची रचना सप्त मंडळातल्या एका ग्रहाच्या तबकडी प्रमाणे करण्यात आली आहे. तसेच बारा राशींचे बारा खांब त्या-त्या राशीच्या रंगाप्रमाणे मार्बलमध्ये करण्यात आलेले आहेत. मंदिराच्या खांबांच्या वर संपुर्ण काचेचे तावदाने लावण्यात आलेली आहे. शनि देवतेची मुर्ती ही काळ्या पाषाणाची असून ती लाभदायक असते.