श्री स्वामी सखा यांच्या आशीर्वादाने व काही दैवी संकेता नुसार सखाप्पा भक्त परिवार, सौदलगा येथे स्थापन झाला. सौदलगा हे गाव श्री हालसिद्धनाथ (आप्पाची वादी) यांच्या क्षेत्रात येते. सदगुरु श्री ना. वा. कोटेकर यांच्या पत्नी यांचे माहेरचे आडनाव 'सौदलगेकर' होते. श्री साधु देव मामलेदार यांनी 1855 ला चिकोडी येथे दत्त पादुका मंदिर स्थापन केले. हे गाव सौदलग्या पासून 22 किलोमीटरवर येते. श्री संत बाळेकून्द्रि महाराज पंचक्रोशित 1920 साली आल्याची नोंद आहे. तसेच हिमालयातुन आलेले संत श्री नागनाथ महाराज येथे येउन समाधीस्त झाले. असे काही संकेत, दृष्टांताद्वारे मिळुन 'सखाप्पा भक्त परिवाराची' स्थापना झाली.

श्री स्वामी सखा यांनी दिलेल्या काही उपासना:
1. दर गुरुवार, शनिवार रात्री 8.30 वा. सामूहिक उपासना
2. 2015 मध्ये स्वामी जयंती आधी 60 दिवसात 32 लाख 'स्वामी समर्थ' जप सामूहिक पद्धतीने पूर्ण केला.
3. श्रावण 2016 ते श्रावण 2017 असे 52 गुरुवार 'सौदलगा ते आप्पाची वाडी' (7 कि. मी.) पदयात्रा अखंड पूर्ण केल्या.
4. श्रावण 2017 पासुन दर गुरुवारी एक मूठ तांदुळ व शनिवारी एक मूठ मुग दाळ घेऊन एक माळ 'श्री स्वामी समर्थ' जप करू न त्याचा नैवेद्य श्री स्वामी ना दाखवावा व सर्वाना प्रसाद म्हणून वाटावा. अशी उपासना श्रावण 2018 पर्यन्त चालू आहे.
5. अक्षय तृतीया 2017 पासुन गुरुवार, शनिवार सामूहिक पद्धतीने सहस्त्र नामाची उपासना चालु आहे.

संपर्क:
श्री जयवंत शेवाळे - 805 073 5033 / 874 895 0213