श्री नृसिहभान (अक्कलकोट स्वामी)
श्री श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापुर्)
श्री नामदेव महाराज (कोल्हापुर)
श्री नाना परांजपे (कामशेत, पनवेल)
          श्री नाना परांजपे यांनी स्वामी सखा यांना शक्तीपात दिक्षा दिली.
     श्री स्वामी सख़ा सुमंत सरस्वती

     "संन्यास कृच्छमः शान्तोनिष्ठा शांती परायणम"

      अर्थात, श्री स्वामींच्या सहज स्वभावानुसार कधी क्रोधाग्नी किवा कधी दयाळु वृत्तीनुरुप त्यांच्या सेवेची पारख करुन श्री स्वामी सखा यांना द्विजरुपी ब्राम्हण दृष्टांतानुसार गुरुपीठ स्थापन करण्यास श्री स्वामींनी आदेश दिला. म्हणुनच श्री स्वामी सखांनी शास्त्राद्वारे आणि वेद उपनिषदांनुसार गुरुपीठाची संपूर्ण माहीती संग्रहीत केली व त्यानुसार अध्यात्म ज्ञानाचा प्रसार या दृष्टीकोनातुन सकल स्वामी भक्तांचा व समर्थवाडीचा उत्तरोत्तर उत्कर्ष होण्यासाठी वेदांत पंडितांकडुन माघ शु. त्रयोद्शी म्हणजेच दि. २५ फेब्रुवारी २००२ रोजी सकाळी ७ वा. गुरुपीठ स्थापना व ११ वा. गुरुपादुका स्थापनेचा मुहूर्त साधुन पुजा करण्यात आली.
गुरुपीठ म्हणजे ज्ञान, शक्ती व धर्मपिठ होय. धर्माचा आदेश प्रत्यक्ष सदगुरुकडुनच येतो. शिष्याच्या मनातील दौर्बल्यता व क्षीणता काढ़ुन गुरु त्याच्या मनात अशी काही शक्ती निर्माण करतो की जणुकाही शिष्य गुरुरूप होतो.

     ध्यानं मुलं गुरुमुर्ती, पुजामुलं गुरुपदं, मंत्रमुलं गुरुवाक्यं, मोक्षमुलं गुरुकृपा.

     || बहूतीव्र साधकासी - केले आपल्यासमान ||

     गुरु आपल्या शिष्याला आपल्यासारखेच तयार करतो. गुरु सुर्यासारखा प्रखर असला तरी शिष्याला चंद्रासारखी शितलता देतो, प्रेमाने जवळ घेतो. गुरुला वेदात व शास्त्रात ज्ञानदिपाची उपमा दिली जाते. म्हणुनच गुरुकडुन ज्ञान घेवुन संपन्न झालेला शिष्य संपूर्ण विश्वाला ज्ञान देवु शकतो. त्यामुळे शास्त्रात, वेद पुराणात गुरुपीठाला वेगळे महत्व आहे.
गुरुपीठ स्थापन करण्यापुर्वी श्री गणेशास वंदन करुन आशिर्वाद प्राप्त करण्यात येतो. गजानना शेजारी दोन हत्तींची धान्याकृती तयार करण्यात येते. त्या हत्तींच्या अंबारीत दोन्ही बाजुला कलश ठेवुन त्यात गंगादि सप्त नद्यांचे व सप्त सागरांचे तीर्थ ठेवुन मंगलार्थ निवडलेला दिवस, योग्य पूर्ण फलदायी होण्यासाठी प्रार्थना करण्यात येते. तसेच नवग्रहांचे आशिर्वाद प्राप्त करुन घेण्यासाठी नवग्रह स्थापना करण्यात येते. याची ग्रह खड्यांच्या स्वरुपात गुरुपीठावर आखणी केली आहे.
     चारही वेदांच्या ब्राम्हणांद्वारे कार्यक्रमास अनुसरुन सर्व विधी यथासांग पार पाडण्यात आला. श्री स्वामी सखा यांना गुरुपीठावर स्थानापन्न करण्यासाठी श्री सेवानंद (बेळगाव), श्री परागस्वामी, श्री सदानंद महाराज (तुंगारेश्वर), शिनोरचे गुरुदेव (बडोदा), प.पू. वृंदावनजी महाराज, प.पू. नाना महाराज परांजपे, श्री मुकुंद महाराज, श्री भाऊरुद्र, श्री कृष्णानंद हे सर्व संतसत्पुरुष उपस्थित होते.
या सर्व संतश्रेष्ठींतर्फे स्वामी सखा यांना जलस्नान घालण्यात आले. ध्वजपुजा (मरुत), पालखी पुजा (गुरुपुजा) व सिंहासन पुजा (विजयादी प्राप्त होण्यासाठी) करण्यात आली. धर्म व वैदिक परंपरेच्या रक्षणासाठी तसेच ज्ञानार्जन करण्याची प्रतिज्ञा करुन श्री स्वामी सखा गुरुपीठावर स्थानापन्न झाले. यावेळी प.पू. श्री नाना महाराजांनी स्वामी सखांना शक्तीपात दिक्षा दिली व सर्वांना शुभाशिर्वाद दिले.