'गुरु' या शब्दाची व्याप्ती अमर्याद आहे. जशी 'आई' या शब्दाची आहे. दोन्ही माऊलीच. आई जन्मदाती जी आपल्याला शरीरातील सर्व पंचतत्वात्मक तंतुरुप कोषाचा गोळा आपल्या उदरातुन व्यक्त रुपात आणते. ती मुलाच्या शरीराचे व मनाचे पोषण करते म्हणुन ती 'पोषण गुरु' व पिता आपल्याला शिक्षण, कपडालत्ता व चैनीची साधने देवुन तोषवितो म्हणुन तो 'तोषण गुरु'.
     शाळा कॉलेजातील शिक्षक फक्त आपल्याला तांत्रिक शिक्षण देवु शकतात.जसे पुस्तकी शिक्षण, एखादी कला, गायन, वादन. परंतु हे त्याच्या उपजीवीकेचे साधन असते. चिरंतन सुखाची अपेक्षा त्याच्या कडुन करणे चुकीचे आहे. म्हणुन तो व्यावसायिक गुरु.
     यापेक्षा वेगळे व्यक्तिमत्व असते ते आपल्या गुरुंचे.
     संत, सत्पुरुष, महात्मे जे वैराग्यसंपन्न, निःशंक असतात. त्यांचे सर्व भक्तगणांवर सारखेच करुणामय, निर्मळ प्रेम असते. गुरु ही असंख्य आत्म्यांची माऊली असते.

"सबसे बडा गुरु, गुरुसे बडा गुरु का ध्यास"

     गुरु परंपरेत दत्त महाराजांनी जे २४ गुरु केले त्या प्रत्येक दृष्टांतात हेच बघावयास मिळते की गुरु शिष्याचे नाते किती अतुट आहे. मुळातच गुरु-शिष्याची जोडी ही जन्मोजन्मीची असते ती तुटत नाही. परंतु त्यासाठी शिष्याला आपली आठवण व ओढ़ रहावी म्हणुन परम भक्ती कडे आकर्षित झाले पाहीजे. शिष्याची संकल्पना अशी पाहीजे की गुरुने आपली आठवण केली पाहीजे. हे नाते कधी जडते? तर 'शिष्याच्या भक्तीने'.
     मानवाच्या दृष्टी या दोन प्रकारच्या असतात. आतुन बाहेर बघतांना अहंकार जोपासला जातो. तर आत बघतांना तो निरहंकार, निरपेक्ष असतो. अध्यात्मिक उंची वाढ़वितो आणि हे सर्व घडण्यासाठी फक्त गुरुच सर्वतोपरी मदत करतात. जीवनाला योग्य दिशा दाखवितात.

"जाशील तिथे मी तुज सांगाती असावे"

     या ओळीप्रमाणे अनुभव हा ख-या गुरुकडुनच मिळतो. जन्मोजन्मी ही गुरुमाऊली शिष्याबरोबर असते. ही साथ कधीच सुटत नाही. दैनंदिन जीवनात शिष्याला योग्य ती दिशा दाखवुन यशस्वी करण्याचे काम फक्त सदगुरुच करत असतात. साधकाला बोट धरुन ईश्वरी दर्शन घडवुन आणणारे आमचे अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ आहेतच.

"जो जो ज्याचा घेतला गुण, तो मी गुरु केला जाण"

     द्त्त महाराजांचे २४ गुरु म्हणजे 'शरकर्ता'. शर म्हणजे बाण. बाण करणारा तो लोहार. लोहार बाणाचे टोक करण्यास इतका एकरुप झाला होता की समोरून राजा, त्याचा लवाजमा, हत्ती, घोडे, पालखी हे गेले. थोडया वेळाने एकाने त्याला विचारले की आमचे राजे येथुन गेले का? त्यावर लोहाराने सांगितले 'मी पाहीले नाही'. याच प्रमाणे ध्यान योगात आपल्या मनाची एकाग्रता आणण्यासाठी धारणा करावी लागते. ही एक शक्ती, एक देवता, एक तत्व, एक परब्रम्ह आहे आणि ते म्हणजे राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ