विष्णु पंचायनातील हे एक मुख्य मंदिर आहे. १९९४-१९९५ च्या दत्त जयंतीच्या सुमारास या मंदिराची प्रतिष्ठापना प.पू. श्री झुरळे महाराज, मयेकर महाराज व बालयोगी पराग स्वामी यांच्या हस्ते झाली. येथे सभा मंडपात श्री दत्त महाराजांच्या साक्षिने एकुण एका वर्षात सोळा यज्ञ संपन्न झाले. रज, सत्व, तम या गुणांचे प्रतिक म्हणुन काळ्या पाषाणातील दत्त मुर्तीची स्थापना करण्यात आली. काळा पाषाण हा पुर्लींगी गुण दर्शवितो त्यामुळे त्या पाषाणातील मुर्तीची सेवा उपासना करतांना अधिक फलद्रुप होते. दत्तमहाराजांच्या पाठीमागे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उभ्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ही मुर्ती श्री स्वामी सखा यांच्या वडीलांनी स्वहस्ते तयार केली आहे. मुर्ती समोरच रौप्य पादुका पुजेला ठेवुन दरवर्षी बुद्ध पौर्णिमेनंतर त्या पादुका संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंतीला स्वामी भक्तांकडे बाहेर पडतात. श्री स्वामींचे मुख उगवत्या सुर्याकडे असून तो आपल्याला स्वामी कार्य चालु असल्याचे दर्शविते व दत्त महाराजांचे मुख मावळत्या दिशेला असुन तो आपणास कलीयुगातील कार्य श्री स्वामींकडे असल्याचे दर्शविते. दत्त मंदिराच्या वर गणपतीची स्थापना करण्यात आली असून त्याला श्रीगणेश अत्रीदत्त देवस्थान असे नाव देण्यात आले आहे.