अर्ध चंद्राकारकृती डोंगर रांगांवरुन दक्षिणे कडुन उत्तरे कडे वाहत जाणा-या प्रवाहामध्ये श्री शैल्य मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. पादूका मंदिर व शैल्य मंदिर यांच्यामध्ये मोठा बांध घालुन पाणी अडवा व पाणी जिरवा या तंत्राचा उपायोग करण्यात आला आहे. श्री दत्तांचा तृतिय अवतार श्री नृसिह सरस्वती महाराज आपलेअ अवतार कार्य संपवून गाणगापूरहून श्री शैल्य मंदिर (कर्दळी वनात) येथे गुप्त झाले. त्याचे प्रतिक म्हणुन शैल्य मंदिराची स्थापना समर्थवाडीतील उत्तरा नदीत करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे केदारनाथ व बद्रीनाथ येथे सहा महीने हिमवृष्टीने जसे दर्शन बंद असते तसेच हे मंदिर सतत सहा महिने पाण्याखाली असल्यामुळे बंद असते. या मंदिराची स्थापना प.पू. गगनगिरी महाराज यांच्या हस्ते झाली. या ठिकाणी सुंदर असा घाट तयार करून त्या ठिकाणी गंगा दशहरा, कोजागिरी पौर्णिमा व गुरुप्रतिपदा असे उत्सव साजरे करण्यात येतात. गाणागापुर व नरसोबाची वाडी याचे प्रतिक म्हणुन हे मंदिर आहे. श्री नारोंच्या पदा प्रमाणे "पुढ़े असावि पवित्रसरिता | वृक्ष लतांची नित्य विपुलता | उभवा गुरुचे मंदिर छान" || धु || याचा प्रत्यय प्रत्यक्ष दर्शी बघावयास मिळतो.