श्री समर्थवाडीचा आज पर्यंतचा प्रवास

१९९४

समर्थवाडीची स्थापना

समर्थवाडी या अदभुत, अध्यात्मिक व विज्ञानयुक्त स्थानाची निर्मीती श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती उर्फ आठल्ये सर यांनी १५ एप्रिल १९९४ या शुभदिवशी दु. २ वा. केली. समर्थ वाडी तील मारुती मंदिराची स्थापना गणेश पुरीचे आनंद स्वामींच्या (नित्यानंद स्वामींचे शिष्य मुक्तानंद स्वामी, मुक्तानंद स्वामींचे शिष्य आनंद स्वामी) हस्ते झाली. त्यावेळी बदलापूर पासुन हत्ती वरुन मिरवणूक काढून तो हत्ती समर्थवाडी येथील ज्ञान सागर परिसरात फिरला होता. त्यानुसार भविष्यात वाडीची हद्द कुठ पर्यंत असेल याचा अंदाज स्वामी सखांनी वर्तविला होता.

१९९५

सूर्य मंदिर स्थापना

श्री स्वामी सखा व प्रद्युम्न यांच्या हस्ते सूर्य मंदिराची स्थापना. या वेळेस 5 रविवार श्री गिरीश जोशी यांनी आदित्य व्रत करून सूर्य मंदिराची पाया भरणी केली. त्या नंतर श्री स्वामी सखा व प्रद्युम्न यांनी त्याचे कलशा रोहन केले.

१९९६-१९९७

दत्त मंदिर व पादुका मंदिर स्थापना

1995-1996 मध्ये दत्त मंदिर व पादुका मंदिराची स्थापना झाली. त्यावेळी श्री झुरळे महाराज व श्री मयेकर महाराज यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले.

१९९७-१९९८

इस्लामपुर येथील मंदिराचा जीर्णोद्धार

1997-1998 साली श्री स्वामी सखा यांनी इस्लामपुर येथील त्यांच्या वडिलोपर्जित काशी विश्वेश्वर व रामेश्वर देवस्थान यांचा जिर्णोद्धार केला. त्या ठिकाणी 1999 पासुन श्री स्वामी सखा यांच्या वडिलांनी तयार केलेल्या श्री स्वामींच्या मूर्ती समोर दत्त जयंती, गुरू पोर्णिमा, स्वामी जयंती असे उत्सव साजरे करण्यात येतात. तसेच तअध्यात्माबरोबरच शेतीचीही आवड असल्याने ईस्लामपुर जवळील रेठरेधरण येथे अवघ्या अडीच एकर मध्ये जणु काही स्वर्गाची निर्मिती केली आहे.

१९९८

धुळे येथील प्रवचन

धुळे येथील स्वामी भक्तांनी श्री स्वामी सखा यांचे प्रवचन आयोजित केले होते. त्या प्रवचनाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. स्वामी सखांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनामुळे तेथिल स्वामी भक्तांना अध्यात्मिक उन्नति साठी योग्य दिशा मिळाली.

१९९९-२०००

नाशिक येथील प्रवचन

1999-2000 या दरम्यान नाशिक करांनी श्री स्वामी सखा यांचे 12 प्रवचन आयोजित केले होते. हे सर्व प्रवचन नाशिक मधिल वेगवेगळ्या ठिकाणी जसे इंदिरानगर, भाभा नगर, काळा राम मंदिर, पंचवटी, मखमलाबाद असे अनेक ठिकाणी झाले. या प्रवचनात् स्वामी सखा यांनी अध्यात्मातील अगदी छोट्या छोट्या गोष्टी विज्ञानाशी सांगड घालून सर्व सामान्य भक्ताला समज़ेल अशा पद्धतीने सांगितले. यामुळे नाशिक मधिल अनेक स्वामीभक्त स्वामी सखा व समर्थ वाडीशी जोडले गेले.

काशी रामेश्वर कावड यात्रा

श्री स्वामी सखा यांनी ९० स्‍वामिभक्तां बरोबर २००० साली काशी रामेश्वर कावड यात्रा पूर्ण केली. यामध्ये काशी हून गंगा घेऊन ती रामेश्वर येथे वाहिली व रामेश्वर येथून सेतु घेऊन तो काशी विश्वेश्वर येथे वाहिला. ही पूर्ण यात्रा रेल्वेने केली.

२०००-२००१

सावरगाव जीर्णोद्धार

2000-2001 या दरम्यान स्वामी सखा यांनी सावरगाव येथील आनंद नाथ स्वामी यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आनंद नाथ स्वामी हे श्री स्वामी समर्थ यांच्या 9 अनुग्रहित शिष्यांपैकी एक होते. तेथे त्यांचे समाधी स्थान, मंदिर व एक विहीर आहे. त्यानंतर स्वामी सखा यांनी सावरगाव ते शिर्डी व बदलापूर ते शिर्डी अशा 2 अयाचित पदयात्रा केल्या.

२००२

अतिरुद्र स्वाहाकार

अकरा महारुद्र जर 100 च्या पटीत केले तर एक अतिरुद्र होतो. या सोहळ्या निमित्त अनेक संत सतपुरूषांचे (श्री पराग स्वामी, श्री मयेकर महाराज, श्री मुकुंद स्वामी) आशीर्वाद व मार्ग दर्शन लाभले. तसेच या दरम्यान गायन, वादन व नृत्याचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. असा हा भव्य दिव्य सोहळा वाडीतील यज्ञ भुमिवर 11 दिवस चालू होता. याचे पौराहित्य श्री दंडगे शास्त्री व श्री सहस्त्रबुद्धे यांनी केले.

गुरुपीठ स्थापना

अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमाच्या वेळेस गुरुपीठाची स्थापना करण्यात आली. श्री नाना परांजपे यांनी श्री स्वामी सखा यांना शक्तिपात दीक्षा दिली. त्यानंतर श्री स्वामी सखा यांना 'पंचम गुरुपीठाधीश' ही पदवी बहाल केली.

२००४

अयुतचंडी सोहळा

9 दिवस रोज 9 नवचंडी केल्यास एक अयुतचंडी होते. 2004 साली अयुत चंडी हा सोहाळा देव नगरी येथे पार पडला. त्या वेळेस श्री सतीश व्यास, श्री अजित कड कड़े यांचे गायनाचे तसेच गणेश कला क्रीडा अँकडमी तर्फ़े नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले होते. हा कार्यक्रम 11 दिवस चालू होता. या कार्यक्रमाचे पौराहित्य श्री बाळशास्त्री जोशी यांनी केले.

प्रति गिरनार स्थापना, विकटगड

प्रति गिरनार म्हणजे गिरनार येथील श्री दत्तगुरुंच्या चरणपादुका स्थानाचे प्रतिकात्मक स्थान. 2004 रोजी विकट गडावर (पेब किल्ला) श्री स्वामी सखा यांनी 2000 वर्षापासुन उध्वस्त झालेल्या दत्त मंदिरा चा जीर्णोद्धार, गिरनार येथील श्री दत्त गुरुंच्या पादुकांना लावून आणलेल्या पादुकांची प्रतिष्ठापना करून केला. विकट गड हा समुद्र सपाटी पासून 2210 फुट उंच असून याचा वापर पूर्वी टेहेळणि साठी होत होता. अशा उंच व विकट ठिकाणी या कार्य क्रमासाठी 350 स्वामीभक्त उपस्थित होते.

२००६

दत्तमंत्र माला अनुष्ठान

दत्त मंत्र माला अनुष्ठान हा कार्य क्रम गुरुपंचा यतन येथील 16 दत्तावतार मंदिरांचे बांधकाम चालू असतां ना झाला. रोज 108 माळा मंत्र असे 7 दिवस हा कार्य क्रम होता. समर्थ वाडी त आलेल्या सर्व स्वामी भक्तां कडून दत्त मंत्र माला जप करूंन घेण्यात आला. या कार्य क्रमाचे पौराहित्य श्री कुलकर्णी गुरुजी यांनी केले.

२००७-२००८

गुरुपंचायतन प्रतिष्ठापना
चारधाम यात्रा

२००९

ऐतिहासिक शिबिर - किल्ले रायगड - किल्ले दर्शन, छायाचित्र प्रदर्शन, तारांगण व बौद्धिक खेळ
समर्थवाडी नूतनीकरण
पुर्वांचल सहल

२०१०

पंचस्वाहाकार सांस्कृतीक यज्ञ सोहळा
नर्मदा परीक्रमा
कृष्णा परीक्रमा
अनोख्या भारताचे दिव्य दर्शन - काश्मीर, लेह व लदाख अध्यात्मिक सहल

२०१२

दत्तात्रेय लीला कथा ज्ञानयज्ञ

२०१४

दंडकारण्य परिक्रमा

2014 साली श्री स्वामी सखा यांनी असंख्य स्वामी भक्तांसमवेत दंडकारण्य परिक्रमा केली.
गुरुपीठ ते गुरुपंचायतन अनुसंधान या सोहळ्या अंतर्गत यजुर्वेद संहिता पठन, धन्वन्तरी याग तसेच श्रीमद भागवत पठन व कथा हे कार्यक्रम झाले. नंतर गुरुपंचायतन मूर्तींचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या दरम्यान प. पू. स्वामी स्वरूपानन्द सरस्वती, आचार्या श्री किशोरजी व्यास (गोविन्द देव गिरीजी महाराज), श्री सुनील चिंचोलकर, श्री मोहन बुवा रामदासी या सर्वाचे सदीच्छा भेट व मार्गदर्शन लाभले.

किष्किंधा अरण्य परीक्रमा
क्रौंचारण्य
चंपारण्य

२०१५

अष्टवैकुन्ठ नैमिषारण्य धाम - गुरु सहवासात अनोखी त्रिवेणि संगम यात्रा - दत्त भागवत कथा सोहळा कार्यक्रम

2016 साली श्री स्वामी सखा यांनी असंख्य स्वामी भक्तांसमवेत नैमिषारण्य यात्रा केली. या दरम्यान तेथे गीता जयंती आंतरराष्ट्रीय महोत्सव 2016 निमित्त श्री स्वामी सखा यांचे श्रीमद् गीता योग संगीतमय सप्ताह आयोजित केला होते. ते प्रवचन 'दिशा चैनल' तर्फ़े सर्व 145 देशात थेट प्रसारित करण्यात आले. स्वामी सखांचे हे प्रवचन ऐकुण सुमारे 70 देशांमधून स्वामी भक्तांचे प्रतिसाद आले.

सुदर्शन याग
पुणे अध्यात्मिक शिबीर

२०१६

श्री दत्त संचार भ्रमण यात्रा - कुरुक्षेत्र (आचमन)
11 दत्त देवस्थान यात्रा
पुणे - मंडई स्वामी मठ ते आळंदी पदयात्रा
पितृपक्षात त्रीस्थळी यात्रा - प्रयाग, वाराणसी व गया
मध्य महाराष्ट्र दर्शन - गोकर्ण महाबळेश्वर, मुरुडेश्वर, धारेश्वर, एड़गुंजी

२०१७

गुरूपिठ वर्धापन दिन सोहळा
खडावली येथील वैशाख स्नान
दत्तमंत्रमाला अनुष्ठान - नरसोबा वाडी ते स्वामी समर्थ वाडी
त्रिवेणि समुद्र संगम पादुका अभिषेक सोहळा - कन्याकुमारी

२०१८

अष्‍टगण यात्रा

आपल्या शास्त्रात सांगितल्या प्रमाणे श्री स्वामी सखा यांच्या सहवासात मोरगाव पासून अष्‍टगण यात्रेला सुरूवात झाली. नंतर सिद्धटेक, पाली ,महाड, थेऊर, लेण्याद्रि, ओझर, रांजनगाव व शेवटी परत मोरगावला गणेश यागाने या अध्यात्मिक सहलीची सांगता झाली. या सहली साठी सुमारे 150 स्वामीभक्त होते. स्वामी सखा बरोबर असल्याने प्रत्येक ठिकाणाचे महत्व स्वामी भक्तांना समज़त होते. हि सहल 3 दिवसात पूर्ण झाली.

महारुद्र स्वाहाकार
गुरू शिखर, माउन्टआबू
सद्गुण समारोह २५ - उदकशांत आणि नवचंडी सोहळा

२०१९

लघुरुद्र स्वाहाकार
श्री क्षेत्र पिठापूर दर्शन यात्रा

२०२०

अयुतरुद्र सोहळा
Visitors: