गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

माहिती सौजन्य: श्री विवेक दिगंबर वैद्य, सामना

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा संप्रदाय महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सर्वत्र सर्वदूर पसरलेला आहे. श्रीस्वामीच्या या जगविख्यात संप्रदायामध्ये अनेक सिद्धसत्पुरुष होऊन गेले त्यातील काही विलक्षण ख्यातकीत झाले त्यांनी स्वत चा संप्रदाय निर्माण केला मात्र उर्वरित सिद्धसत्पुरुष काळाच्या पडद्याआडच राहिले. त्यांनी कधी जगासमोर येण्याचा प्रयत्न केला नाही. जगाशी फटकून वागणाऱ्या आणि स्वतःला कायम उपेक्षित ठेवण्यातच आनंद मानणाऱ्या या सत्पुरुषांची संख्यादेखीत विलक्षण आहे. असेच एक महत्त्वाचे सिद्धसत्पुरुष म्हणजे पुणे येथे समाधिस्थ झालेले श्रीकाळबुवा महाराज.

विष्णुबुवा नारायण शेंबेकर या मूळ नावाचे हे संतसत्पुरुष पंढरपूर येथे अनेक दिवस उदास वृत्तीने राहत होते. ते सदासर्वकाळ मुखाने काळ सर्वांचा बाप आहे असे म्हणत असत लोकांनी त्याच्या जवळपास आलेले त्यांना बिलकूल खपत नसे ते ब्रह्मात्म तत्वानुभवी असून कुणासही त्रास न देता एका बाजूला गुपचूप पडून राहत असत एकदा त्यांच्या हातून एका मुलाला मार बसला तेव्हा लगेच त्या मुलाच्या घरातील मंडळींनी बुवाविषयी तक्रार दाखल केली म्हणून मामलेदारानी बुवाना सोलापूर येथे घेऊन येण्यासाठी अधिकारी पाठवले.

विष्णू परशुराम रानडे या अधिकान्यापुढे बुवांना उभे करण्यात आले. चौकशी अधिकाऱ्यांनी बुवांना मारहाणीच्या प्रकरणाबद्दल विचारले असता बुवांनी त्यांना असंवद्ध उत्तरे दिली काळ बाप सर्वांस खातो असे मोठमोठ्याने बोलून काळ काळ असा सतत उच्चार केला. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांनी बुबांना वेडा ठरवून त्यांची पुण्यातील स्पितळात रवानगी केली तेथेही ते काळ काळ असेच बोलत राहिले डेव्हिड ससूनच्या दवाखान्यात बुवा सतत काळ काळ ओरडत राहत एकदा श्रीस्वामी समर्थांचे शिष्य वामनबुवा वांबोरीकर काही कामानिमित्त इस्पितळात गेले असता त्यांना बुवांच्या मुखातून येणारे ते विचित्र शब्द ऐकून विस्मय वाटला इतक्यात तिथे सदाशिवराव गोवळे नावाचे सद्गृहस्थ आले. त्याकाळी अवघ्या पुण्यास सदाशिवराव प्रख्यात समाजसेवक असल्याचे ज्ञात होते.

सदाशिवरावानी काळबुवाचे वागणे बोलणे पाहिले त्यांच्यातील सत्पुरुषत्व जाणले आणि स्वतःच्या जबाबदारीवर त्यांना इस्पितळातून सोडवून शुक्रवार पेठेत योग्य ठिकाणी आणून ठेवले पुढे श्रीस्वामी समर्थ शिष्य वामनबुवा वांबोरीकर सानी बुवांना अतिशय प्रेमाने विचारले. आपण सत्पुरुष दिसता आपण कोण कोठले, आपले सांप्रदायिक गुरू कोण है कृपया मला सांगावे" त्यावर काळी त्यांच्या सांगितल्या आणि त्यांचा श्रीस्वामी समर्थ महाराजाशी असलेला सबंधही लक्षात आणून दिला. सदाशिवराव गोवंडे हे सालस होते त्यांनी वाचायोग्य व्यवस्था ठेवली आणि अतिमाय प्रेमाने सेवा केली. त्या पंढरपूर येथील घटनेनंतर काळबुवा पुण्यात प्रसिद्धीस आले. अनेक भक्त त्यांच्या दर्शनार्थ येत असत आणि अनेकाच्या मनोकामना पूर्ण होत असत. काळबुवा अतिशय निस्पृह आणि अपरिग्रही असून ते सदासर्वकाळ एकटेच राहत असत.

काळबुवांचे वर्तन विसंगत भासत असले तरीही त्याच्या संपर्कामध्ये श्रीदेवमामलेदार, आळदीचे श्रीनृसिंह सरस्वती, अण्णासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या थोर देवतुल्य विभूती होत्या.

काळबुवा सदैव दिगंबरावस्थेत असत. अनेकदा पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावरील माडीवर किंवा भांबुडर्याच्या डोंगरावरही ते बसत असल्याचे उल्लेख त्यांच्या भक्तांनी नोंदवलेले आहेत. भांबुडचा हा परिसर पुण्यामध्ये शिवाजीनगर या नावाने ओळखला जातो आणि काळबुवा ज्या डोंगरावर बसत. तिथे त्यांचे समकालीन सिद्धसत्पुरुष श्रीजंगली महाराज यांनी समाधी घेतली. सध्या तिथे श्रीजंगली महाराजांचे भव्य समाधी मंदिर बांधले असून हा रस्तादेखील श्रीजगती महाराज मार्ग म्हणून ओळखला जातो.

पूर्वी पंढरपूर येथे ज्या मुलाला काळबुवाकडून मार बसला होता. त्यावेळी ज्या ब्राह्मणाने मनाशी अनाठायी वैर धरून काळांवर खोटे बालट आले, तोच ब्राह्मण के दिवशी अक्कलकोट येथे गेला त्यावेळी समर्था मूर्ती खास बागेत विश्रांती घेत होती. तो ब्राह्मण दर्शनाकरिता आला तेव्हा श्रीस्वामीरायांनी विचारले, 'का रे आमच्या वर का धरले? श्रीस्वामींच्या या प्रश्नाचा रोख त्या ब्राह्मणाला चटकन उमगला आणि काळबुवाना त्रास दिल्याचा पश्चात्ताप होऊन श्रीस्वामीची क्षमा मागता झाला.

श्रीकाळबुवा महाराजांचे सलग चरित्र दुर्दैवाने उपलब्ध नाही. हे नेमके कोण होते अनु कुठून आले याविषयीचा पूर्वेतिहास जसा ज्ञात नाही तसाच तो काळबुवानी स्वमुखाने कधी सांगितलाही नाही. एरवी गुढ तरीही भविष्यदर्शी सत्यकथन करणाऱ्या या सत्पुरुषाला काळ आला काळ आला या परवलीच्या शब्दामुळे काळबुवा हे नाव पडले आणि तेच कायमस्वरूपी रूढ झाले १९१८ साली समाधीस्थ झालेल्या या प्रसिद्धीपराङ्मुख सिद्धसत्पुरुषाची समाधी पुण्यातील श्री ओंकारेश्वर मंदिराच्या पिछाडीस त्यांच्या इतकीच दुर्लक्षित आहे.