गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट
शिष्य: गंगाधर महाराज
समाधी: १९१०

बाळाप्पा महाराज हे मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील. ते ब्राह्मण कुळातील असूनही सावकारी व्यवसायात होते. ते सोनारी व्यवसायाही करीत. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना संसारात विरक्ती आली आणि सद्गुरूंच्या शोधात ते श्रीक्षेत्र गाणगापूरी रवाना झाले.

थोरल्या मुलीचा विवाह व मुलाची मुंज आटोपून घरदाराचा त्याग करून सद्गुरू शोधार्थ ते बाहेर पडले. मुरगोडहुन गाणगापूरला गेले. अनुष्ठान केले. एका ब्राम्हणाने बाळाप्पाना स्वप्नात येऊन सांगितले. 'तुम्ही अक्कलकोटी जाऊन स्वामी समर्थांची सेवा करावी.' अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी एक पैशाची खडीसाखर घेतली. स्वप्नात पाहिलेल्या मूर्ती प्रमाणेच स्वामींची मूर्ती पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्रीनाही खूप आनंद झाला. त्यांनी या झाडास मिठी म।र अशी कृती करुन दाखवली व बाळप्पावरील प्रेम व्यक्त केले.

बाळाप्पा महाराज जेव्हा अक्कलकोटी पोहोचले. त्यांची खात्री झाली दिगंबर अवस्थेतील जे सत्पुरूष त्यांना स्वप्नदृष्टांत देत होते तेच श्रीस्वामी. जीवा शिवाची भेट झाली. बाळाप्पांनी स्वामींचे चरणी धाव घेतली व चरण घट्ट पकडले. गुरुशिष्याची भेट हा अनमोल क्षण होता आणि बाळप्पा अक्कलकोटी स्थिरावले. त्यांनी आपले तन मन आत्मा स्वामी चरणी समर्पण केले. श्रीस्वामी राजवाड्यात ८ दिवस राहण्यास होते. बाळप्पांचे दर्शन होईना. मंदिरातच त्यांनी तपश्र्चर्या व जपसेवा सुरू केली. एकदा दर्शनाची संधीही मिळाली. पण महाराजांनी त्यांना प्रसाद दिला नाही. बाळाप्पा दु:खी झाले ते सोडून सर्वांना स्वामींनी प्रसाद दिला. नंतर त्यांना समजले स्वामींना जे जावेत असे वाटत त्यांना ते प्रसाद देऊन बोलवीत असत. हे समजल्यावर त्यांना अधिक आनंद झाला व त्यांनी सेवेची व्याप्ती व एकनिष्ठता वाढवली. त्यांना आनंद वाटे की दत्तावतारी स्वामींची सेवा करण्याची संधी मिळत आहे.

श्री स्वामी महाराजांचे सानिध्यात बाळाप्पाना नित्य बोधमृत मिळत असे. महाराज सेवेकऱ्यांना अत्यंत प्रेमाने वागवत. सेवेकरी उंचावर बसल्यास खाली बैस म्हणून सांगत. एकदा स्वामी बाळप्पास म्हणाले कारे 'तुला गावास जावयाचे आहे काय?', 'समुद्र भरला आहे त्यातून घेवेल तितके घ्यावे', 'आळशी माणसाचे तोंडही पाहू नये.' बाळाप्पा श्रीमंत आणि खानदानी घराण्यातील असल्याने पाणी आणणे, स्वयंपाक करणे ही कामे कराण्याची प्रथम लाज वाटे, तेव्हा स्वामी म्हणाले, 'निर्लज्जो गुरुसान्निधो'. गुरुंची सेवा करताना लाज बाळगू नये.

एकदा स्वामी बाळप्पास म्हणाले," जे असेल ते द्या वा चालते व्हा " हि आज्ञा शिरसावंद्य मानून बाळाप्पा ने भिकभाली, कांबळी, पडशी, तांब्या, पंचपात्रे वगैरे वस्तू स्वामीचरणी अर्पण केल्या व साष्टांग नमस्कार घातला. सुंदराबाई म्हणतात, 'त्यांना कांबळी असुद्यात' तेव्हा स्वामी म्हणाले "त्यास शालजोडी मिळेल". कोठेही ममत्व न ठेवता सर्वसंग परित्याग कर, हेच स्वामींनी या द्वारे सूचित केले. बाळाप्पाची त्याच्या निष्ठेमुळे अध्यात्मिक प्रगती झाली. आणि एकदा बाळाप्पा स्वामींना प्रसन्नचित्ताने नमस्कार करीत असताना स्वामींनी आपली तुळशीची प्रासादिक माळ त्यांचा गळ्यात घातली व 'यात्रा झाली कारे' असा त्रिवार उच्चार केला व माळे द्वारे स्वामींनी आपल्या तापसमार्थ्याचा वारसाच बाळाप्पाना दिला.

स्वामींचा निर्वाण काळ जवळ आला असता स्वामींनी आपल्या हातातील,"श्री स्वामी समर्थ" अक्षरे कोरलेली अंगठी बाळप्पाच्या बोटात घातली, जणू माझा शिक्का तू चालावं असा अशीर्वादच दिला. स्वामींनी आपल्या कंठातील रुद्राक्ष, छाटी, हातात निशाण दिले. प्रसाद पादुका दिल्या व मस्तकावर वरदहस्त ठेवला. शेवटी स्वामी म्हणाले औदुंबर छायेत बैस. श्रींचे अवतार कार्य बाळाप्पा कडे आले. मठ हीं बांधून झाला. बाळप्पानी श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज हे नाव धारण करून चातुर्थाश्रम स्वीकारला.

स्वामींनी त्यांना तुळशीची माळ देऊन त्यांनी जप करण्यास सांगितले. त्यानंतर बाळप्पांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. स्वामीनी एकदा त्यांच्या नाव असलेली एक अंगठी बाळप्पांना भेट दिली व म्हणाले "साधनेत निमग्न रहा माझे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत" या आश्र्वासनाने बाळाप्पा भारावले. आनंदाश्रुंनी श्री स्वामींच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक झाला. त्यांनी बाळप्पाला आशिर्वादाबरोबर आपली कफनी, पादुका, दंड व निशाण दिले व औदुंबराखाली स्वतंत्र मठ स्थापनेची आज्ञा दिली. हाच बाळप्पा मठ किंवा गुरुमंदीर नावाने प्रसिद्ध आहे.

स्वामींचे निर्याणानंतर बाळाप्पा खचले अत्यंत दु:खी होऊन जीवनाचा आधार व कार्यकारणच संपल्याचे भासले व समाधीसमोर अन्नत्याग करून बसले. तिसऱ्या दिवशी स्वामींनी स्वत: प्रकट होऊन बाळप्पाना सांगितले. मी येथेच आहे मी निराकार स्वरूपात आहे. मग बाळप्पांनी पादूकातच स्वामींना पाहण्यास सुरुवात केली.

पादूकांचीच सेवा एकनिष्ठेने करू लागले. ते आजारी असतानाच त्यांनी त्या पादूकांची सेवा कधी सोडली नाही. बाळप्पा महाराज १९१० मध्ये समाधिस्त झाले. स्वामी समर्थांच्या निर्याणानंतर बाळप्पा जवळजवळ ३२ वर्षे होते.
श्री गंगाधर महाराज त्यांचे उत्तराधीकारी झाले व त्यांनी या कार्याची ध्वजा हाती घेतली. याच पीठावर पुढे श्री गजानन महाराज (अक्कलकोट) हे उत्तराधिकारी झाले. बाळाप्पा महाराजांप्रमाणे एकनिष्ठ व प्रामाणिक सेवक विरळाच.

गुरुपरंपरा श्री दत्तात्रेय

श्री स्वामी समर्थ

श्री बाळाप्पा

श्री गंगाधर स्वामी

श्री गजानन महाराज

*स्वामी आणि बाळप्पामधील प्रारब्धाबद्दल संवाद होतो. स्वामी, 'बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते.'

बाळप्पा, 'स्वामी, यावर काही उपाय नाही का?'

स्वामी, 'अरे, एकदा पापाचे विपरीत-प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे-पुढे करू शकतात, पण ते प्रारब्ध भोगावेच लागते. अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत-नकळत परिस्थितीवश होऊन पापं घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत-प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्‍वरभक्ती करायची असते.' 'लोग कहते हैं की, भगवान के यहा न्याय मे देर हैं। अरे, भगवान सबको समय देता हैं अपने पाप नष्ट करने का. कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नहीं माने, तब उनका संहार किया!'

बाळप्पा, 'स्वामी, मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे?'

स्वामी, 'अरे, जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो, आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो, पण जेव्हा दु:खाचे वारे सुटते, तेव्हाच ईश्‍वराची कास सोडते. म्हणतो, 'मी देवाचे एवढे करतो, पण माझ्यावर हे संकट का आले? बाळ्या, पण तो हे विसरतो की, देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली, ती जर केली नसती, तर आणखी भयाण संकट आले असते.'*

स्वामी सेवेचा नित्यपाठ बाळाप्पानी घालून दिला जो आजतागायत चालू आहे.

स्वामींनी कधीही बाळाप्पाना प्रसाद नाही दिला. असे म्हणतात की एकदा स्वामीनी बाळाप्पाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले "अरे तु या प्रसादाच्या मागे काय लागला आहेस जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी कधिच दिला आहे माझ्या मांडीवर तुला घेतले आहे माझ्या मांडी शेजारीच मांडी घालुन बस हाच तुला प्रसाद." या नंतर बाळाप्पांनी कधिही प्रसादाचा हट्ट केला नाही ओळखलात का? तो कुठला प्रसाद? स्वामींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी! जी कोणालाही मिळाली नाही! धन्य ते स्वामीगुरु अन धन्य ते शिष्य बाळाप्पा!

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिनी भक्तश्रेष्ठ श्री बाळाप्पा यांची ही माहिती स्वामी चरणी अर्पण