गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

जन्म: २२ नोव्हें, १८३८, माघ शु. ८ शके १७६०,
आईवडील: गंगुताई / बळवंतराय बिडकर
गुरू: स्वामी समर्थ अक्कलकोट
कार्यकाळ: १८३८-१९१२
शिष्य: श्रीरावसाहेब ऊर्फ बाबा सहस्त्रबुद्धे
विवाह: २१व्या वर्षी, राणूबाईंशी विवाह (रामजी आप्पाजी पाटील केडगाव यांची कन्या)

पुण्याचे श्री रामानंद बिडकर हे स्वामींचे एकनिष्ठ शिष्य.

व्यवसाय सुगंध्याचा व्यवसायासाठी खूप भ्रमण केले. याच काळात मिळालेल्या धनाने व्यसनाधीन झाले. परंतु मूळची विरक्त वृत्ती त्यांना अंकुश लावू लागली. विचार मंथन सुरु झाले व त्यातूनच अक्कलकोटी स्वामींचे दर्शनास जाण्याची प्रेरणा झाली. स्वामींचे पहिल्याच भेटीत वृत्तीत आमूलाग्र बदल झाले व तीसऱ्या भेटीत स्वामींचा अनुग्रह झाला आणि त्यांचे कडून नर्मदा परिक्रमेची आज्ञा झाली. पण म।हेश्वर मुक्कामी असताना श्री स्वामी समर्थांच्या समाधीची वार्ता समजली. स्वामी समर्थांना स्वरूप संप्रदायाच्या उत्थापन व प्रसाराची गरज भासली व त्यांनी ती जबाबदारी एकनिष्ठ शिष्य पुण्याचे रामानंद बिडकर यांचे खांद्यावर टाकली.

पहिल्याच भेटीत स्वामी समर्थांनी त्यांना जाणले, परिक्षा घेतली आणि रामानंद त्यांचे आवडते भक्त झाले. रामानंदांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यापार सुरू केला. त्यांनी जोहरी म्हणून पुण्यात नावलौकिक मिळवला.
स्वामी पहिल्या भेटीतच त्यांच्यावर रागावले. संतापले. पण रामानंदांनी सेवा सोडली नाही. हीच नर परीक्षा होती. तिसऱ्या अक्कलकोटच्या भेटीत रामानंद स्वामींचे पाय दाबण्याची सेवा करीत होते. एक विषारी नाग त्यांच्यामध्ये फुत्कार करू लागला. रामानंदांनी स्वामींची सेवा सोडली नाही. क्षणार्धात स्वामी उठले आणि त्यांनी ताडकन मुस्काटात मारली आणि रामानंद समाधीत गेले. ही समाधी १२ तास चालली. पण त्याप्रसंगानंतर त्यांचे जीवन बदलले. भौतिक जीवनाबाबत ते पूर्णतया उदासीन झाले. स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून मूळची सत्प्रवृत्ती पल्लवीत झाली.

त्यांचा शिष्य परिवार फार मोठा, पण त्यांच्या या शिष्य मांदियाळीत रावसाहेब सहस्रबुद्धे हे एक अधिकारी सत्पुरूष होऊन गेले त्यांची समाधी सुद्धा पुणे येथे शिवाजीनगर भागात आहे. रामानंद बिडकर महाराजांचा इ. स. १९११ मध्ये त्यांना अनुग्रह झाला. "आमचा उपदेश वेड लावून घेण्याचा आहे, पण वेडा होण्याला आज कोणीही तयार नाही ही बिडकर महाराजांची खंत रावसाहेबांनी दूर केली. आणि ते परमार्थाचे वेडे झाले.

गुरुपरंपरा
श्री स्वामी समर्थ

श्री रामानंद बिडकर महाराज

श्री वासुदेवानंत सरस्वती (सद्गुरू बाबा महाराज सहस्रबुद्धे)

माया ही ब्रह्मा आणी मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते. बीडकर यांची आध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणू स्वामींनी केलेली ही उपाय योजना होती. नुसते धातूचे स्वर्ण करत बसल्या पेक्ष्या आता बीडकर स्वताच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले होते.

रामानंद बीडकर | होते सतेज सुंदर |
भक्ती मार्गाची ओढ फार | स्वामींकडे ते गेले होते |
पारखून घेति स्वामी | त्यांना ओळखून अंतर्यामी |
सत्व परीक्षा घेवुनी त्यांची | स्वरूप लीन त्यांना केले ||