गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

जन्म: ज्ञात नाही, आळंदीत १८७४ ला आले
आई/वडील: ज्ञात नाही
वेष: संन्यासी
कार्यकाळ: १८७४ ते १८८६
गुरु: अक्कलकोट चे श्री स्वामी समर्थ
समाधी: पौष शु. १५, १८८६ आळंदी येथे.

दत्तावतारी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच ब्रह्मांडनायक सद्गुरु स्वामी समर्थ यांचे कृपाकींत सत्पुरुष, त्यांचा पूर्व वृत्तांत जन्म, आई, वडिल, बालपण, कुल गोत्र याबाबत कोठलेही माहिती उपलब्ध नाही. स्वामी महाराजांनीही आपल्या कार्यकालात कधीही उल्लेख केला नाही.

स्वामी प्रसिद्धिपराङ्मुख होते. त्यांची आज्ञा नसल्यामुळे त्यांना स्वमुखाने सांगितलेला ‘श्रीस्वात्मसौख्य’ हा ग्रंथ किंवा त्यांचे जीवनचरित्र त्यांचेसमोर प्रसिद्ध होऊ शकले नाहीत. पुढे सुमारे ७७ वर्षांनी वै. वा. श्रीभक्त माधवबुवा गोडबोले हे स्वामींच्या गादीवर असताना ‘सार्थ श्रीस्वात्मसौख्य’ आणि ‘श्रीआळंदीचे स्वामी’ हे चरित्र ग्रंथ छापून प्रसिद्ध झाले.

श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीनरसिंहसरस्वती या नावाचे एक थोर दत्तावतारी सत्पुरुष होऊन गेले. स्वामींनी तेथे एकूण १२ वर्षे वास्तव्य केले व ज्या दिवशी हा १२ वर्षांचा काल पूर्ण झाला त्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमा शके १८०७ रोजी श्रीज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे जीवंत समाधी घेऊन आपले अवतार कार्य संपविले. त्यांचा मठ आणि समाधीस्थान आळंदीला गोपाळपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे.

महास्वामी चिदंबर दिक्षीत यांनी गुर्लहोसुरला जो सोमयाग केला तेव्हा आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी उपस्थित होते असा उल्लेख आढळतो. प. पू. गोंदवलेकर महाराज नैमिषारण्यात गुरुच्या शोधार्थ फिरत असता एका गुहेत प्रवेश केला होता तेव्हा तेथे सहा महान तपस्वी योगी होते. त्यापैकी एक श्री नरसिंह सरस्वती स्वामी आळंदी हे होते असा उल्लेख आढळतो.

इ. स. १८७४ च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज भ्रमण करीत करीत श्री क्षेत्र आळंदी येथे आले. तेथे त्यांचे वास्तव्य १२ वर्षे होते. आळंदीच्या स्वामी महाराजांवर अक्कलकोट स्वामी समर्थांची पूर्ण कृपादृष्टी होती. त्यांच्या या प्रकट काळात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज समर्थाना भेटण्यास २ वेळा अक्कलकोट क्षेत्री गेल्याचा उल्लेख गोपाळबुवांच्या बखरीत आढळतो.

श्री नरसिंहस्वामी, स्वामींशी संबोधन करतात. धर्मप्रचार करतांना सामोरे जातांना येणाऱ्या अडचणी सांगतात. स्वामी सांगतात- "हे कार्य करणे इतक सोपं नसतं, कधी फुलं तर कधी अंगारे प्राप्त होतात.

"व्यसन हे अध्यात्म प्रगतीच्या मार्गात मोठी बाधा आहे, तिच्यावर विजय मिळवायलाच हवा." हा स्वामी समर्थांचा उपदेश आजीवन पाळला.

पौष पौर्णिमेला, इ.स. १८८६ साली त्यांनी आळंदीत जिवंत समाधी घेतली.