श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य परमपूजनीय सद्गुरू डॉ. सुमंताश्रमजी महाराज यांचा ब्रह्मावधूत महोत्सव सोहळा व दत्तयाग
दि. १९, २० व २१ फेब्रुवारी २०२४
कार्यस्थळ: श्री एकमुखी दत्त मंदिर पटांगण, रामतीर्थ, नाशिक
कार्यक्रम व बातम्या
समर्थवाडी ब्लॉग्स (Blogs)
श्री स्वामी सखा यांचा संन्यास दीक्षा कार्यक्रम
दि. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२२
विद्वत परिषदेशी निगडित असलेले काशीचे पाच आचार्य, तसेच श्री स्वामी पगलानंद आणि श्री शंकराचार्य (भानपुरा, मध्यप्रदेश) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 'श्रीमान अशोक ओझा' हे प्रमुख आचार्य होते.
या कार्यक्रमानंतर श्रीमतपरमहंस स्वामी सुमंताश्रमजी महाराज असे त्यांचे नामकरण झाले.
संन्यासदीक्षेचे महत्त्व
संन्यास आश्रमाचे उद्दिष्ट मोक्षप्राप्ती हे आहे. संन्यास म्हणजे सांसारिक बंधनातून मुक्त होणे आणि नि:स्वार्थ भावनेने सतत परमेश्वराचे स्मरण करणे. संन्यासाला शास्त्रात जीवनाचा सर्वोच्च टप्पा म्हटले आहे. जो संन्यास व्रत करतो त्याला संन्यासी म्हणतात.
श्रीमतपरमहंस स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांचे चातुर्मास अनुष्ठान - मंडलेश्वर ((मध्यप्रदेश)
श्रीमतपरमहंस स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांचे अज्ञात वासातील (काही क्षण)
श्रीमतपरमहंस स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांचे पहिल्या अज्ञात वासातील (10 दिवस) काही क्षण
मुक्तेश्वर महादेव मंदिर, मुक्तेश्वर (उत्तराखंड) - कपिलेश्वर महादेव मंदिर, कलेसिम (उत्तराखंड) - डोल आश्रम, अल्मोडा (हिमाचल) - कसार देवी मंदिर, अल्मोडा(उत्तराखंड) - जागेश्वर धाम मंदिर, अल्मोडा (उत्तराखंड) - पाताल देवी, शैल, अल्मोडा (उत्तराखंड) - कटारमल सूर्य मंदिर, अल्मोडा (उत्तराखंड) - बीनेश्वर महादेव मंदिर, बिंसर (उत्तराखंड) - द्वारहाट मंदिर समूह, द्वारहाट (उत्तराखंड) - वृद्ध केदार मंदिर, रातापानी, (उत्तराखंड) - सोमेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वर - वैजनाथ मंदिर - बागनाथ मंदिर - पाताल भुवनेश्वर मंदिर (उत्तराखंड)
समर्थवाडी रौप्य महोत्सवी वर्ष २०१८
मनी अध्यात्माचा ध्यास | धरुनी विकासाची कास | घडला समर्थवाडीचा इतिहास
श्री स्वामी सखा यांनी अयाचित (जवळ एक पैसा ही न घेता) वृत्तीने १८,००० किमी पायी प्रवास केला. यामध्ये जगन्नाथपुरी, अक्कलकोट व आळंदी पदयात्रा आहेत.
श्री स्वामी सखा यांच्या राशि नुसार त्यांची मकर रास ही भूमि तत्वाची रास असून जगन्नाथपुरी व आळंदी हे धाम आहे. मकर राशीच्या लोकांनी केलेल्या पदयात्रा या त्यांच्या अध्यात्मिक उन्नति साठी जास्त श्रेयस्कर असतात. म्हणून स्वामी सखा यांनी १९९४ साली २३०० किलोमीटरची जगन्नाथ पूरी ही पदयात्रा अयाचित वृत्तीने ९२ दिवसात पूर्ण केली तसेच बदलापूर ते अक्कलकोट व बदलापूर ते आळंदी अशा कधी एकट्याने तर कधी स्वामी भक्तां समवेत आजपर्यंत २८ अयाचित पदयात्रा केल्या आहेत.
गुरूपंचायतन संस्थान तर्फे आजपर्यंत ४५ अध्यात्मिक सहली आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये गुरू शिखर, कन्याकुमारी पादुका समुद्र स्नान, बद्रिनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री अशा सहली आहेत. तसेच कृष्णा परीक्रमा, नर्मदा परीक्रमा, गिरनार परीक्रमा व ब्रह्मगिरि परिक्रमा अशा काही महत्त्वाच्या प्रदक्षिणा आहेत.
श्री स्वामी सखा यांनी ९० स्वामिभक्तां बरोबर २००० साली काशी रामेश्वर कावड यात्रा पूर्ण केली. यामध्ये काशी हून गंगा घेऊन ती रामेश्वर येथे वाहिली व रामेश्वर येथून सेतु घेऊन तो काशी विश्वेश्वर येथे वाहिला. ही पूर्ण यात्रा रेल्वेने केली.
समर्थवाड़ी मध्ये आजपर्यंत २१ पेक्षा जास्त याग संपन्न झाले. यामध्ये अयुतचण्डी याग, अतिरुद्र स्वाहाकार, पंच महास्वाहाकार यासारखे याग अनेक संत सत्पुरुषांच्या साक्षीने व आशीर्वादाने उत्साहात साजरे करण्यात आले.
अयाचित पदयात्रा
जगन्नाथपुरी, अक्कलकोट, आळंदी
अध्यात्मिक वाहन रॅली
अक्कलकोट
अध्यात्मिक सहली
चारधाम यात्रा, 11 दत्त देवस्थान यात्रा, काशी रामेश्वर कावड यात्रा, श्री दत्त संचार भ्रमण यात्रा...
यज्ञ व याग
अतिरुद्र स्वाहाकार, अयुतचण्डी, पंच महास्वाहाकार...
परीक्रमा
नर्मदा परीक्रमा, कृष्णा परीक्रमा, गिरनार परीक्रमा व ब्रह्मगिरि परीक्रमा
समर्थवाडी
सु ख़समाधानासाठी, आनंदासाठी आपन प्रपंचाचा अंगिकार करतो. पण अशा व्यवहारातुन मिळणारे सुख क्षणभंगुर असते. कदाचित या क्षणभंगुर आनंदापासुन अनंतकॉटी समाधान साधण्यासाठी अध्यात्माची गरज या कलियुगात आहे. अशी प्रपंच व अध्यात्माची सांगड केवळ संत सत्पुरूषच घालु शकतात. ज्या प्रकारे संत अरण्यात, डोंगरात, कडेकपारीत राहुन, तप करून परमेश्वर प्राप्त करून घेतात, त्या प्रमाणे साधना उपासना, जप तप अथवा व्रत हे असे एकांत वनश्रींच्या, पशु पक्षांच्या सानिध्यात राहुन केल्यास परमेश्वर प्राप्त करून घेता येतो. या तत्वाचा पूर्ण अभ्यास करून सप्तरंगी ईंद्रधनुष्याचा प्रकाश सगऴीकडे पसरावा, समाज सुढ़ूढ बनावा आणि सगुण साकार वृत्तीचा संस्कार पुर्ण करुन हि परंपरा अशीच पुढ़े चालावी यासाठी दत्तात्रेय महाराजांच्या साक्षीने, स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी हे उपासना स्थान, संप्रदायाला लाभलेल्या प्रेरक तत्त्वाच्या भक्तगणांच्या अथक परिश्रमांनी आज सिद्ध झाले आहे.
समर्थ वाडी येथील प्रकल्प व उपक्रम
श्री समर्थ वाडी येथे अवघ्या ६ एकरच्या नापीक परीसरात वातावरणातील प्रदुषण लक्षात घेवुन ७२००० औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. वाडीत नित्यनियमितपणे अग्निहोत्र, याग, यज्ञ आणि होम संपन्न होतात. यामुळे वातावरणातील संतुलन राखण्यास मदत झाली आहे.
श्रवण संक्षिप्त गुरुचरित्र
श्री स्वामी सखा यांच्या दिव्य वाणीद्वारे श्रवण संक्षिप्त गुरुचरित्र
श्री स्वामी यांचे शिष्य
- श्री गंगाधर महाराज (बाळाप्पा)
- श्री बीडकर महाराज, पुणे
- श्री ब्रह्मनिष्ठ वामन बुवा वामोरीकर
- श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी
- संत श्री सीताराम महाराज मंगळवेढेकर
- श्री परम गुरु तात महाराज
- श्री दादासाहेब तथा श्री सच्चीदानंद स्वामीकुमार- स्वामीसुतांचे बंधू
- श्री रांगोळी महाराज
- श्री गोपाळबुवा केळकर (श्री प्रीतीनंद स्वप्नीकुमार महाराज)
- श्री काळ बुवा
- श्री आनंदनाथ महाराज
- श्री स्वामीसुत
- श्री नाना रेखी
- श्री देव मामलेदार
- श्री शंकर महाराज
- श्री नाना केजकर
- श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर)
- श्री गंगाधर महाराज
- श्री बाबा महाराज सहस्त्रबुद्धे
- श्री चिले महाराज