सुर्य मंदिर
सुर्योपासनेसाठी प्राकृतीक स्वरूपाचा अभ्यास करून चार चौकोनाच्या कर्णावर पाय-या बांधुन २४ तास सुर्य पृथ्वीवर आहे हे २४ कोप-यांनी दर्शवुन तसेच मराठी १२ महिने व अधिक महिना १३ वा असा १३ टप्यांनी ७ खांबांचा आधार घेवुन सप्तरंगी सप्तदिवसाच्या सुर्य मंडळातील किंवा नवग्रह मंडळातील सुर्याची अंडाकृती प्रतिकृती पृथ्वीवर २१ अंक्षावर, ९ बाय ९ फुटाच्या चौत-यावर, ३ बाय ३ फुटाच्य गाभा-याने सुर्य मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. सुर्य म्हणजे अग्नि व पाणी म्हणजेच जीवन हे एकमेकांना अत्यंत पूरक आहेत. याचा विचार करुन नऊ ग्रहांचा अधिपती म्हणून पूर्ण वर्षाचा दाता, सप्तरंगाचा विधाता, सात संगतीचा अधिष्ठाता व कर्णाचा पिता म्हणून याचे दर्शन घेतांना कोप-यातुन घ्यावे लागते. पृथ्वी निर्माण झाल्यापासून सर्व घटकांच्या साक्षी पुरावा म्हणून सुर्य देवाची स्थापना करण्यात आली. हे स्थान सात टप्यांमध्ये बांधले असुन त्याची रचना अंडाकृती आहे. सुर्य हा नऊ ग्रहांचा अधिपती असल्यामुळे त्याच्या अवती भोवती नवग्रह यज्ञामध्ये नऊ ग्रहांची काळ्या पाषाणातील सुबक मुर्तींची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या ध्यानगृहात नऊ जण बसु शकतात अशी बैठक व्यवस्था आहे. मंदिराच्या खालच्या बाजुस दोन चाके आहेत. ते अर्धे जमीनीत व अर्धे वर असुन ते दिवस व रात्र दर्शवितात.