जळगाव शहरा पासून 18 किलो मीटर अंतरावर असलेल्या पोखरी या गावात 'गुरुपद्म' हे स्थान दीड गुन्ठे जागेत आकार घेत आहे.
2014 च्या डिसेंबर मध्ये श्री स्वामी सखा यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने आणि पद्मालयाच्या मोरया च्या साक्षीने हे स्थान जळगाव येथील स्वामी भक्तां ना अनुभूती म्हणून मिळाले.
यात गुरू आणि पद्मालय येथील मोरया गणेश यांचे पद्म (कमळ) म्हणून 'गुरुपद्म' असे नामकरण झाले.श्री स्वामी सखा यांनीच येथील शिल्प कृती आरेखन व संकल्पना दिली. या प्लॉट च्या मध्य भागी 18 बाय 18 फूट असा पिवळया जैसलमेर मार्बल मध्ये श्री यंत्रा कृती भद्रासन असून मधोमध एक खांब आहे. त्यावर पंढा-या मार्बल च्या कमळा सनात श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका असतील.ज्या वरुन जला भिषेक होऊन तेच जल तिथे कारंजा स्वरुप चहु बाजूंनी खळ्खळाट करत खाली येईल.
श्री स्वामी सखा यांनी स्वत:चे चरण कमल हे मूळ स्थानाच्या दुसा-या पायरी वर चारही बाजूंनी उमट विले आहे. मधल्या खांबा च्या आत मध्ये पवित्र ग्रंथ गुरूमार्ग वा त्यावर श्री स्वामी समर्थ यांच्या काष्ठ पादुका कायम स्वरूपी ठेवून दिल्या आहे.ज्या दिवशी ही स्थापना झाली त्या दिवशी आश्विन नवरात्रातील ललिता पंचमी हा दिवस होता. या गुरुपद्म च्या बाजूला श्री स्वामी सखा यांच्या निवास स्थानाची उभारणी होत आहे.

संपर्क:
श्री मनोज जोशी - अध्यक्ष - 942 034 7272
श्री दिपक बाविस्कर - सचिव - 927 233 2079