दत्तसंप्रदाय
का
ही जणांच्या मते जीवनाची व्याख्या म्हणजे माणुस जन्माला आला, जगला आणि मेला एवढ़ी छोटी. लक्ष योनीतुन या जीवाचा जन्म मरणाचा प्रवास अखंडीत चालु असतो. या अखंड प्रवासाला खंडीत करण्याची, ही जीवन मरणाची बेडी तोडायची, यातुन मोक्ष मिळ्वण्याची संधी या जीवाला तेव्हा मिळते जेव्हा त्याला नरदेह प्राप्त होतो.मनुष्य जन्मात या जीवाला आणखी एक शक्ती देतो ती म्हणजे बुद्धी.
हिच बुद्धी या जीवाला मी कोण? कुठुन आलो? माझ्या जन्म मरणाची बेडी कशी तुटेल? माझ्या जन्माची सार्थकता कशात आहे? माझ्या या आणि अशा प्रश्नांची उत्तरे मला कोण देईल? या करीता मी कोणासमोर शरणागत होऊ? ज्यामुळे माझे कल्याण होईल? या विचारांची प्रेरणा देते.
जेव्हा एखादा जीव याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो सदगुरुचा शोध घेवु लागतो. त्याचे कारण समर्थ रामदासांनी खालील शब्दात सांगितले आहे.