सूचना व नियम
- हे स्थान पहावे असे कोणासही बंधन नाही.
- हे उपासना स्थान असुन येथे गोंधळ करू नये.
- आपली सेवा व्यक्तिगत अथवा समूहाने सादर करा. त्यासाठी येथील स्थानिक स्वामी भक्तांचे साहाय्य घ्यावे.
- गरजेच्या आवश्यक वस्तू मागून घ्या व सेवा झाल्यावर त्या वस्तू जागेवर ठेवा / ताब्यात द्या.
- आपल्या मौल्यवान वस्तू स्वत: सांभाळा.
- येथे उपासक - उपासना, साधक - साधना, भक्त - भक्ति, सेवक - सेवा करीत असताना त्यांना त्रास होईल असे वागू नका.
- पुरूषांनी धोतर, लुंगी, लेंगा (पांढरा), वय वर्षे 10 खालील मुलांनी हाफ पॅंट व मुलींनी फ्रॉक परिधान करावा. स्रियांनी साडी परिधान करावी.
- समर्थ वाडीत कॅमेरा, मोबाईल, चामडी व प्लास्टिक बॅग नेण्यास मनाई आहे. या बद्दल कोणीही कसलीही तक्रार करता कामा नये.
- दर्शनाला जाण्यापुर्वी आपली नावे रजिस्टर मध्ये नोंद करावी.
- साधना, उपासना, सेवा व वास्तव्य करू इच्छिणा-या स्वामी भक्तांनी स्वागत कक्षात आवश्यक अर्ज भरून सोबत जवाब दार व्यक्ती / नाते वाइक यांचे परवानगी पत्र जोडावे.
- कोणत्याही साधकाचा / उपासकाचा / सेवकाचा / स्वामीभक्ताचा उपमर्द होईल असे कोणीही वागु नये.