वृक्ष संवर्धन
सन १९७९ साली झालेल्या दृष्टांतानुसार स्वामी सखांनी विकटगडाचा विकास केला. आजपर्यंत स्वामी सखांनी सतत कधी एकटे, कधी भक्तांबरोबर जाऊन मंदिर व गुहा स्वच्छ केल्या व त्याची रंग रंगोटी केली.
विकट गडावर वन्य जीवांना त्या त्या हंगामानुसार कायम् काहीतरी खाण्यासाठी मिळावे व त्यांची उदर निर्वाहाची सोय व्हावी या उद्देशा नुसार श्री स्वामी सखा यांनी 1979 साला पासून दरवर्षी पावसाळ्यात उपयुक्त वनस्पतींची लागवड करून वृक्ष संवर्धनाचे महत्वाचे कार्य हाती घेतले आहे. त्या मध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी व वणवा पतिबंध उपाय म्हणून गुरूपंचायतन संस्थान, समर्थ वाडी तर्फे विकट गडावर 2017 साला पासून 'सगूणा वनसंवर्धन तंत्रा' च्या सहाय्याने वन संवर्धन केले जाते. या तंत्राचा वापर करून आपण दरवर्षी डोंगरांना लागणारे वणवे रोखु शकतो. डोंगर उतरावर होणारि मातीची धुप थांबविणे. डोंगराच्या भुगर्भात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपण्यासाठी मातीची दाणेदार कणरचना निर्माण करणे. कठीण परिस्थितीत तग धरणा-या निवडक वनस्पतींचे 'जिवंत कंटूर बंडिंग' करून भुगर्भ व बाह्य परिसरात सकारात्मक वातावरण निर्मिती करून नवीन वृक्ष लागवडी साठी योग्य परिस्थिती तयार करणे. तसेच कडे कोसळणे थांबविणे.
अशा रितीने विकट गडावर वृक्ष संवर्धन करण्याचा प्रयत्न चालू आहे जेणे करून भविष्यात हा परिसर आपल्याला हिरवाईने नटलेला दिसेल.