पादुका मंदिर
समर्थ वाडीत पादुका मंदिरात गेल्यावर त्या ठिकाणी औदुंबर् नरसोबावाडी, गाणगापूर या क्षेत्राचा भास होतो. पादूका मंदिरातील पादूका या कांदेवाडी मठातील सिद्ध पादूका असून त्या पादूका येथील काही स्वामीभक्त अक्कलकोट येथे देण्यासाठी जात असतांना समर्थवाडी येथे थांबुन त्या पादूका येथे भेट द्याव्यात या हेतुने त्यांनी पादूका दिल्या. इंदुर येथील द्त्त सांप्रदायीक श्री प. पू. कस्तूरे महारा यांच्या हस्ते सिद्ध मंत्र घोषाने स्थापन करण्यात आल्या. या ठिकाणी श्री स्वामी सखा यांनी मंदिर व ध्यानगृह रचना करून औदुंबरा मध्येच मंदिर बांधले. या ठिकाणी स्वामीभक्तांना पारायणासाठी कठडा व शेड उभी केली आहे. तसेच स्वामी भक्तांनी लिहुन आणलेल्या स्वामी समर्थ जपाच्या वह्या मोठ्या पादूकांमध्ये ठेवल्या, त्यावरती एक मोठे छत्र उभे केले. या ठिकाणी त्रिकाळ पूजा होत असुन इच्छीत मनोकामना पुर्ण होतात.