जन्म: १४ नोव्हेंबर १८८३
आई/वडील: लक्ष्मीबाई/नारायणराव
संन्यासानंतरचे नाव: श्री सद्गुरू वासुदेवानंत सरस्वती महाराज
संप्रदाय: स्वरूप संप्रदाय
कार्यकाळ: १८८३ -
गुरू: प. पू. रामानंद बिडकर महाराज

प. पू. बाबामहाराजांचा जन्म एका धार्मिक व संस्कार संपन्न कुटुंबात १४ नोव्हेंबर १८८३ मध्ये कर्नाटकातील हुबळीत झाला. त्यांचे रामचंद्र नावाने नामकरण झाले. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनीअरींगला प्रवेश घेतला. इंजिनीअरींगची पदवी (LCE) घेतल्यानंतर त्यांनी PHD १९०९ मध्ये नोकरी घेतली. त्यांना कामानिमित्त पेण, महाड, रत्नागिरी, पनवेल, नागोठणे येथे बदल्या झाल्या. १९२३ ला ते मुख्य स्थापत्य विषारदाचे PA म्हणून लागले.

इ.स. १९०६ मध्ये प. पू. बिडकर महाराजांकडून त्यांना शक्तिपात दिक्षेचे कृपादान मिळाले आणि त्यांचे जीवनच अंतर्बाह्य बदलले. त्यांची विचाराची दिशा बदलली. दिक्षादानानंतर महाराज विदेही स्थितीतच राहू लागले.

घरच्या लोकांच्या दबावाकारण श्रीबाबांनी विवाह केला. पण त्यांची संसारात संपूर्ण विरक्ती होती.

प. पू. बाबा महाराजांना अनेक सत्पुरूष सन्मान देत त्यात मुख्यत्वे करून शंकरमहाराज, मेहरबाबा, योगी अरविंद सद्गुरू लेले महाराज हे सत्पुरूष होते. १९५३ मध्ये बाबा महाराजांनी श्री. विष्णु गणेश जोशी यांच्यावर अनुग्रह केला. पुढे ते दिगंबरदास नावानेच प्रसिद्धीस आले. त्यांनाच सद्गुरूंनी स्वरूप संप्रदायाच्या प्रचाराची धूरा सोपवली.

इ. स. १९५४ साली त्यांनी आपला देह पुणे येथे निर्गुण परब्रह्मात विलीन केला. त्यांची समाधी चतुश्रुंगी रस्त्यावर जाताना श्री. प. पू. बाबामहाराज समाधी मठ या नावाने आहे. तो परिसर त्यांनी अत्यंत पवित्र आणि धार्मिक असा जपला आहे. तेथेच एक मोठी वेद पाठशाळा ही आहे. सातत्याने या वास्तुत अनेक अनुष्ठाने, पाठ उपासना चालूच असते. पुण्यनगरीतील हे धार्मिक व अध्यात्मिक केंद्रच आहे. पवित्रता हाच येथील केंद्रबिंदू आहे.

गुरुपरंपरा

श्री स्वामी समर्थ

श्री रामानंद बिडकर

श्री वासुदेवानंत सरस्वती महाराज (बाबा महाराज सहस्त्रबुद्धे)