दत्तसंप्रदाय

     काही जणांच्या मते जीवनाची व्याख्या म्हणजे माणुस जन्माला आला, जगला आणि मेला एवढ़ी छोटी. लक्ष योनीतुन या जीवाचा जन्म मरणाचा प्रवास अखंडीत चालु असतो. या अखंड प्रवासाला खंडीत करण्याची, ही जीवन मरणाची बेडी तोडायची, यातुन मोक्ष मिळ्वण्याची संधी या जीवाला तेव्हा मिळते जेव्हा त्याला नरदेह प्राप्त होतो.मनुष्य जन्मात या जीवाला आणखी एक शक्ती देतो ती म्हणजे बुद्धी.
हिच बुद्धी या जीवाला मी कोण? कुठुन आलो? माझ्या जन्म मरणाची बेडी कशी तुटेल? माझ्या जन्माची सार्थकता कशात आहे? माझ्या या आणि अशा प्रश्नांची उत्तरे मला कोण देईल? या करीता मी कोणासमोर शरणागत होऊ? ज्यामुळे माझे कल्याण होईल? या विचारांची प्रेरणा देते.
जेव्हा एखादा जीव याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो सदगुरुचा शोध घेवु लागतो. त्याचे कारण समर्थ रामदासांनी खालील शब्दात सांगितले आहे.

मंत्र तंत्र उपदेशिते गुरु आहेत घरोघरी आईने
परी शिष्या मेळवी सदवस्तुने जाणावा

     याचाच अर्थ असा कि, मनुष्य जीवाला लौकीक, प्रसिद्ध जीवन जगतांना जे ज्ञान, धन व कौशल्य लागते ते त्याला गुरुच शिकवितात. असे अनेक गुरु त्याला भेटतात. त्या गुरुच्या स्थानी जन्मदाती आई, पिता, शिक्षक व मित्र परीवार असु शकतो परंतु हे व्यावहारीक गुरुजन आहेत. त्यांच्याकडुन जे ज्ञान मिळते त्यामुळे जीवन सुखी व समाधानी होते पण जीवनाची खरी सार्थकता मिळत नाही.
     हिच सार्थकता मिळविण्यासाठी गुरु लागतो. या सदगुरुमुळेच आपल्या जन्मोजन्मीच्या गाठी सुटु शकतात.
सदगुरुचा शोध फक्त मनुष्यच घेतो असे नाही तर प्रत्यक्षात श्री दत्तात्रयांनी सुद्धा जीवनात १ नाही २ नाही तर तब्बल २४ गुरु केलेत. याचा संबंध श्री गुरुचरीत्रात व एक नाथांनी भागवतात दिला आहे.
श्री गुरुदेव हे आपले सर्वांचेच गुरु आहेत. दत्त म्हणजे सत्व, रज व तम या गुणांचे दर्शन घडविणारी देवता. ब्रम्हा, विष्णु व महेश यांचा अंशावतार.
     श्री दत्तत्रेय हे महर्षी अत्री व पतिव्रता माता अनुसया यांचे सुपुत्र. या अत्रिनंदनाने दत्तसंप्रदाय निर्माण केला.या संप्रदायात अनेक अवतारी पुरुष जन्माला आले व त्यांनी माणुस घडविण्याचे व माणुसकी निर्माण करण्याचे काम केले, मानवी जीवनाला आकार देण्यासाठी, त्याला घडविण्यासाठी या सदगुरु रुपी कुंभाराची गरज आहे. मानवी जीवाने जगतांना व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये ज्याच्या पासुन जे गुण घेण्यासारखे आहे ते घ्यावे व स्वःताचे अवगुण टाकुन द्यावे.

 
दत्तजयंती उत्सव 2017

दत्तजयंती उत्सव 2017
More Photos

हनुमान जयंती मिरवणुक, २००९
More Videos

Sign In
User Id:
Password:
 
New member Sign Up here.

Advertise with us