दत्तात्रेयांचे चोवीस गुरु

श्री दत्तात्रयांनी २४ गुरु केले व त्यांच्यापासुन काय शिकलो हे यदुराजाला सांगितले तसेच कोणते गुण घेतले व कोणत्या अवगुणांचा त्याग केला हेही सांगितले.

श्री दत्तात्रयांनी केलेल्या २४ गुरुंची माहीतीः

१. पृथ्वीः
कोणी कितीही त्रास दिला, कितीही घाव घातले तरीही आपण त्याला मोठया मनाने क्षमा करावी हि आहे पृथ्वीची क्षमाशीलता. पृथ्वी हि क्षमाशीलतेच्या बाबतील अगदी अग्रगण्य आहे. याचच अर्थ असा की आपण जमीन नांगरतो, खणतो, तिच्यावर कुदळ चालवितो तरी ती सर्व सहन करतेच करते पण तिची परोपकारिता म्हणजे ती आपल्याला प्रत्येक घामाच्या थेंबाप्रमाणे एक ओंजळ भरुन दाणे देते. दुसरे म्हणजे या मातीचा सुगंध. हा तिचा गंध वेगळाच असतो.आपले या मातीशी असणारे नाते हे या मातीतुनच बहरते व या मातीतच सामावुन जाते. द्त्तात्रय म्हणतात कि मी या पृथ्वी कडुन सहनशीलता, क्षमाशीलता व परोपकार हे गुण घेतले.

२. वायु (निर्लेपता, अनासक्ती)
वायु म्हणजे प्राण जो अनेक जीवांना जीवीत ठेवण्याचे कार्य करतो. तरीसुद्धा हा वायु त्यातुन अनासक्त रहातो. दत्तात्रय म्हणतात कि वायुचा हा गुण मी घेतला आहे.
जीवाला चैतन्य, चेतना देतो तो हाच वायु. सुगंधाची देवाण घेवाण करतो, ग्रीष्मात जीवाला सुखावतो, पाऊस पाडतो. हा वायु सा-या विश्वाला सुख देतो पण कोणाकडुन कसलीच अपेक्षा करत नाही.

३. आकाश (असंगता, व्यापकता)
जर समानता शिकायची असेल तर ती शिकावी आकाशाकडुन. कारण आकाश हे सर्व ठिकाणी समान आहे. दत्त दिगंबरांनी आकाशाकडुन समतेचा गुण घेतला आहे. आकाशात कितीही काळे पांढ़रे ढ़ग आले तरी आकाश आपल्या ठीकाणी निर्मळ रहाते. म्हणुन मनुष्याने आकाशाकडुन अलिप्त व अनासक्त रहाण्याचा गुण घ्यावा.

४. जल (शुद्धता, पावित्र्य)
जल म्हणजेच पाणी, त्यालाच आपण जीवन म्हणतो. शुद्धता, पावित्र्यता, थंडावा व सर्व जीवांची तहान भागविणे हे पाण्याचे गुण आहे. पाणी कधीही उच्च - निच, माझा-तुझा असा भेदभाव करत नाही. मृत्युनंतर मानवाला सदगती लाभावी म्हणुनही पाणीच सोडावे लागते. दत्तात्रय सांगतात कि पाण्यापासुन आपण मृदुता, माधुर्य व लोककल्याण हे गुण घ्यावे.

५. अग्नी (तेजस्विता, उपयोगिता)
अग्नीचा गुण म्हणजे अंधाराचा नाश करुन प्रकाश देणे, तेज निर्माण करणे. होमाच्या अग्नीत पापाचा नाश होतो. अग्नी अवती भोवती जे जे अमंगळ, हीन आहे त्याचा नाश करतो व वातावरण शुद्ध करतो. अग्नीची ही कृती असंग्रहीत आहे. अवधुत सांगतात की अग्नीकडुन या गोष्टीचा बोध घ्यावा.

६. चंद्र (सोम) (देहाचे नश्वरत्व, आत्म्याचे अविनाशीत्व)
शांत व शीतल स्वभाव आहे तो चंद्राचा. मनुष्याचे मनही चंद्रासारखे शांत व शीतल असावे. मनुष्याचा मनाचा व चंद्राचा अगदी जवळचा संबंध आहे. चंद्र हा घटाबरोबर उत्पन्न होत नाही व घट फुटला तर तो नाशही पावत नाही. म्हणजेच चंद्र अविनाशी आहे. दत्तप्रभु सांगतात की मनुष्याने आत्मस्वरुपाशी चंद्राप्रमाणेच स्वाभाविक रुपात सुस्थिर रहावे.

७. सुर्य (भेदाभेद शुन्यता)
मनुष्य जीवाला जर अलिप्त राहुन कर्तव्य दक्ष रहायचे असेल तर त्याने सुर्यासारखे व्हायला हवे. सुर्य सर्व सृष्टीचा निर्माता आहे असे आपण मानतो. सुर्याकडुन आपल्याला उष्ण्ता, प्रकाश व तेज मिळते व यावरच सर्व सृष्टी चालते. जरी हा सुर्य सर्व करतो तरी तो पाऊस पाडतो. त्यामुळे अन्नधान्य पिकते. थोडक्यात संगोपन करतो, संरक्षण करतो, संवर्धन करतो तरीही अलिप्तच रहातो. तो हे सर्व करतांना पाण्याप्रमाणेच भेदाभेद करीत नाही. दत्तप्रभु सांगतात की सुर्याकडुन अलिप्तपणा, भेदाभेद व कर्तव्यदक्ष हे गुण घ्यावे.

८. कपोत पक्षी (अति स्नेह व संग यांच्यापासुन वर्जित)
कपोत या पक्षाचे निरीक्षण करतांना दत्तात्रेयांनी पाहिले की नर मादी हे घरटं बांधतात व नंतर पिल्ले देतात. त्यांची जीव लावुन काळजी घेतात. जेव्हा याच पिल्लांच्या पंखात बळ येते तेव्हा हिच पिल्ले उडुन जातात. त्यावेळेस पिल्ले उडुन गेली असा शोकही हे नर मादी करत नाही. दत्तात्रेय सांगतात की आसक्ती कोणी ठेवु नये. कपोत पक्षाचा हा गुण सर्वानी घ्यावा.

९. अजगर (देवाने प्राप्त स्थितीत संतोष)
अजगर हा सुस्त व मिळेल त्यात संतुष्ट होणारा आहे. तो तोंड उघडतो व जे मिळेल त्यात सुख मानतो. अवधुत सांगतात की मानवाने सुद्ध परमार्थात जे मिळेल त्यात संतुष्ट व ईश्वर सेवेत मग्न रहावे. म्हणजेच "ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असु द्यावे समाधान".

१० समुद्र (गंभीरता)
आपली मर्यादा न सोडणे हा गुण आहे समुद्राचा. समुद्रात लाटांचा कितीही खळखळाट असला मग जरी उसळ्त्या लाटांचे जरी तांडव असले तरी समुद्र हा अंतरंगात शांत व गंभीरच असतो. कारण समुद्राचा मुळ स्वभाव हा शांत व गंभीर आहे. दत्तप्रभुंच्या मते मानवाने समुद्राकडुन मर्यादा व संयम हे गुण घ्यावे. जसे कितीही नद्या, नाले, ओढे सागरात सामावतात तरीही हो निर्मळ रहातो तसे मानवाने रहावे.

११. पतंग (रुप सक्तीचा नाश)
अवधुत पहातात की, दिव्याची ज्योत आणि तिच्याभोवती पिंगा घालणारा पतंग. हा पतंग ज्योतीच्या जवळ जातो तो तिच्या तेजस्वीपणामुळे. जेव्हा हा पतंग अलिंगन देतच जळुन जातो म्हणजे त्याच्या रुपाचा नाश होतो. अवधुत सांगतात की स्त्री संगतीने मनुष्याचे अधःपतन होते म्हणुन त्यापासुन दुरच रहावे.

१२. हत्ती (स्पर्श, आसक्तीचा त्याग)
श्री गजाननाला आपण जसे बुद्धीची देवता मानतो तसेच बुद्धीमान प्राणी म्हणुन हत्तीला संबोधतो. श्री दत्तात्रेय म्हणतात की मनुष्य जीवाच्या अंगी हत्तीसारखी चिकाटी व संथगती असावी परंतु हाच हत्ती जेव्हा एखाद्य हत्तीणीच्या सहवासात जातो तेव्हा तो एक प्रकारच्या बंधनात अडकतो. त्याप्रमाणे सदगुरुंना असे सुचवायचे आहे की हत्तीप्रमाणे चिकाटी व संथगती योग्य पण परस्रीचा सहवास नको. जर जीवनात काही साध्य करायचे असेल तर हत्तीचा आदर्श समोर ठेवावा.

१३. भुंगा (शास्त्रामधुन सार संचय)
प्रत्येक जीवाला वाटत असते की आपले आयुष्य आनंदी व सुखी असावे. भंगा हा फुलामधुन फक्त मधच गोळा करतो तसे मानवाने सुद्धा आयुष्यात धर्मग्रंथे, धर्मशास्त्रे व संतबोध यातुन आत्मज्ञानाचे अमृत (मध) गोळा करावे म्हणजे आयुष्यात आनंद व सुख यांचा साठा होईल.

१४. हरीण (शब्द सक्तीचा त्याग)
सदैव स्वतःच्या नादात रंगुन जाते ते म्हणजे हरीण. दत्तात्रेय सांगतात की मानवाने आपल्या उपासनेत असे रंगुन जावे म्हणजे त्याची जन्ममरणाच्या बेडीतुन सुटका होते. जसे हरीणाला माहीत नसते की आपल्याच बेंबीत कस्तुरी आहे तसेच मानवाला सुद्धा माहीत नसते की आपल्या जवळच आत्माराम आहे. तो आत्माराम आपल्याला ओळखावा लागतो, शोधावा लागतो.

१५. मधमाशी (अधिक वस्तुंचा संग्रह वर्ज्य)
माणसाने आयुष्यात संग्रह करावा पण मधमाशीचे उदहरण डोळ्यासमोर ठेवावे. मधमाशी मधाचा साठा करत जाते, त्याचे पोळं तयार करते. पण त्याचा उपयोग तिला न होता दुस-यांना होतो. म्हणुनच अवधुत सांगतात की मानवाने अति संग्रह करु नये.

१६. मासा (रसाक्तीचा त्याग)
मासा हा जलचर प्राणी. तो पाण्यासाठी तडपत असतो तसाच मानवी जीव सुखासाठी तडपडत असतो. मासा हा चपळ आहे, तो सहजासहजी कोणाच्याच हाती लागत नाही पण तो बळी पडतो अमिषाला. अवधुत सांगतात, मानवाने आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवावे म्हणजे दुःखापासुन दुर राहील.

१७. वेश्या (आशेचा त्याग नैराश्येचे ग्रहण)
पिंगळा वेश्या ही जेव्हा आशेने परपुरुषाच्या बंधनात अडकते तेव्हा तिच्या वाटेला फक्त नैराश्यच पडते. पण या नैराश्येतुन तिला स्वतःच्या आत्मपुरुषाची ओळख पटते तेव्हा ती या बंधनातुन मुक्त होते. यावरुन दत्तात्रेय सांगतात की जर मानवाला जर जन्म मरणाच्या बेडीतुन मुक्तता मिळवायची असेल तर त्याने ईश्वराला शरणांगत जावे.

१८. टिटवी (प्रिय वस्तुचा त्याग)
एकदा अत्रिनंदन एका टिटवीचे निरिक्षण करतात, तिच्या तोंडात माशाचा तुकडा होता व तो मिळविण्यासाठी इतर पक्षी तिच्यावर झेप घेतात. त्यात ती खुप जखमी होते. पण जेव्हा ती तो तुकडा सोडुन देते तेव्हा ते पक्षी तिला सोडुन देतात. म्हणुन अवधुत सांगतात की आयुष्यात दुःख नको असेल तर अति संग्रह करु नये. प्रिय वस्तुंच्या त्याग करावा.

१९. बालक (चिंताशुन्य वृत्ती)
दत्तात्रेय सांगतात की मानवाला चिंताशुन्य, निष्पाप, निरागस व निस्वार्थीपणे जगायचे असेल तर बालकाकडुन या गोष्टीची शिकवण घ्यावी. जेव्हा सदगुरु बालकाकडे पहातात तेव्हा त्यांना बालकामध्ये योगीचे (साध्वी) दर्शन होते. योगी व बालक यांना मान, अपमान नसतात. ते त्या स्थितीत सुख मानतात.

२०. कुमारीका (एकाकी रहाणे)
एकदा सदगुरु भिक्षा मागता मागता एका कुमारीकेच्या घरी जातात. ती त्यांना मोठ्या आदराने बसायला पाट देते व आपण धान्य काढायला जाते. पण त्या अगोदर ती हातातल्या बांगडया काढुन ठेवते. तेव्हा अत्रिनंदन तिला विचारतात तु असे का केले? तर ती म्हणते की एकावर एक घासुन बांगडयांचा नाद होतो. याचा अर्थ असा की एकटेपणातच खरे सुख आहे. दोघजण असल्यावर फक्त दुःखच वाट्याला येते.

 Samarthwadi

Samarthwadi
More Photos

हनुमान जयंती मिरवणुक, २००९
More Videos

Sign In
User Id:
Password:
 
New member Sign Up here.

Advertise with us